CTET परीक्षेतील गुणांमध्ये 5% सुट देणेबाबत परिपत्रक ; या घटकातील उमेदवारांना लागु !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding 5% relaxation in marks in CTET exam ] : इयत्ता 1 ली ते 8 वीच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरीता अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती / भटक्या जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती क / भटक्या जमाती ड / इतर मागास प्रवर्ग / विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणिक …

मागास प्रवर्ग / खुला प्रवर्ग मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांकरीता सदर सीटीईटी पात्रता गुणांमध्ये 5 टक्के सुट देण्यात आलेली आहे .

तर शासन निर्णय दिनांक 07 फेब्रुवारी 2019 मध्ये नमुद केल्याप्रमाणे केंद्रशासन व राज्य शासन मार्फत आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने सीटीईटी उत्तीर्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना सदर परीक्षामधील गुणांमध्ये 5 टक्केची सुट देण्याबाबत संभ्रम निर्माण होत होता ..

यामुळे सदर परिपत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे कि , शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्र शासन व राज्य शासन मार्फत आयोजित अथवा केंद्र शासन अथवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट व्याख्या व पात्रता गुणांमधील सुट याबाबतची तरतुद राज्य खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 मध्ये नमुद आहे .

तसेच दिनांक 07.02.2019 मध्ये देखिल शिक्षक पात्रता परीक्षेची व्याख्या करण्यात आलेली आहे . यामुळे सदर शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये देण्यात येणारी सुट ही केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत करण्यात आलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा करीता लागु असणार आहे .

Leave a Comment