Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employees get travel allowance even after retirement in this case ] : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना काही प्रकरणी निवृत्तीनंतर देखिल प्रवास भत्ता मिळत असतो . नेमके कोण-कोणत्या प्रकरणी निवृत्तीनंतर प्रवास भत्ता मिळतो ? या संदर्भात सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
01.दि.22.11.1961 रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवेत असताना मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ( कुटुंबांना ) शासकीय कामकाज निमित्तासाठी ( पेन्शन प्रकरणी ) आगाऊ प्रवास भत्ता देण्याचे निर्देश आहेत .
02. तसेच सेवेत असताना कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन प्रकरणांकरीता निवृत्तीनंतर देखिल प्रवास भत्ता अदा करण्याचे निर्देश आहेत . तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना सरकारच्या वतीने विभागीय चौकशी कामी करावा लागणार प्रवास याकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 20.06.2006 रोजीच्या निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे .
यांमध्ये निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना ते जरी निवृत्त असले तरी देखिल सरकारी कामकाजचा भाग म्हणून न्यायालयात अथवा विभागीय चौकशी प्रकरणी अधिकारी यांच्या समक्ष हजर रहावे लागते .
तथापि अशा निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर कामाकरीता उपस्थित राहणेकामी देय असणारा प्रवास भत्ता , दैनिक भत्ता , तसेच नियमानुसार विश्रामगृहात सवलतीच्या दरांमध्ये राहण्याची सोय उपलब्ध असेल .
अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता व दैनिक भत्ता विभाग विभागाच्या दिनांक 21.05.2005 रोजीच्या अधिसुचना नुसार विहीत दराप्रमाणे अदा करण्याचे निर्देश आहेत .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !