Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Financial benefit of Rs. 30,000/- per person for senior citizens of the state aged 60 years and above. ] : राज्यातील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिव्यक्ती 30,000/- रुपये आर्थिक लाभ देणेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
या निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील सर्व धार्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन यात्रा करीता प्रति व्यक्ती 30,000/- रुपये इतका आर्थिक लाभ मिळणार आहे .
या योजनेचे मुख्य उद्देश : राज्यातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने , तसेच त्यांच्यासोबत कोणी नसल्याने , त्यांचे तीर्थयात्रा पुर्ण करण्याचे स्वप्न पुर्ण होत नाही . यामुळे सदर योजना सुरु करण्यात येत आहे .
योजनेची व्याप्ती : सदर योजनांमध्ये राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असणार आहे . तसेच सदर योजना अंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरीता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येणार आहे .
तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा ही प्रती व्यक्ती 30,000/- रुपये इतकी असणार आहे , यांमध्ये भोजन , निवास , प्रत्यक्ष प्रवास इ. बाबींचा समावेश असेल . या योजनांसाठी राज्यातील 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वर्षे असणारे नागरिक योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील .
इतर पात्रता : नागरिक महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा , त्याचे वय हे 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वर्षे असावेत तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावेत .
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना “या” प्रकरणी निवृत्तीनंतर देखिल मिळतो प्रवास भत्ता ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !
- Retirement Age : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे बाबत काही महत्वपुर्ण घडामोडी !
- CTET परीक्षेतील गुणांमध्ये 5% सुट देणेबाबत परिपत्रक ; या घटकातील उमेदवारांना लागु !
- कंत्राटी / हंगामी अस्थायी सेवेतुन नियमित झालेल्यांना Carrer Advancement Scheme अंतर्गत लाभ देणेबाबत GR दि.18.02.2026
- राज्यातील शाळांसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता सुधारित आकृतीबंध लागु करणेबाबत GR निर्गमित दि.18.02.2026