Gratuity : निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन GR नुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपये फरक मिळणार ; कोर्टाचा निकाल वाचा सविस्तर .

Spread the love

Mh-Tv संगीता पवार प्रतिनिधी [ Gratutity update news ] : सेवानिवृत्ती उपदान संदर्भात उच्च न्यायालयाने दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे, त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम वीस लाख रुपये फरक मिळणार आहे , या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेऊयात .

राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या , शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदनाची रक्कम 14 लाख रुपये वरून 20 लाख रुपये ( केंद्र सरकार प्रमाणे ) सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात होते की , सदर  सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 01 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे . त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाहीत असे स्पष्ट करण्यात होते.

परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली , व  दिनांक 1 सप्टेंबर 2024 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील वीस लाख रुपये सेवानिवृत्ती उपदनाची रक्कम मिळावी  या मागणीकरिता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये  दाखल याचिकेवर दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे ..

कोर्टाचा निकाल : या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्तीवेतनधारकांच्या बाजूने निकाल दिल्याने , आता सातवा वेतन आयोग व प्रमाणे म्हणजेच सन 2016 पासूनच सेवानिवृत्ती उपदनाची रक्कम ही 14 लाख रुपये वरून 20 लाख रुपये मिळणार आहे .

Leave a Comment