महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना “या” प्रकरणी निवृत्तीनंतर देखिल मिळतो प्रवास भत्ता ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employees get travel allowance even after retirement in this case ] : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना काही प्रकरणी निवृत्तीनंतर देखिल प्रवास भत्ता मिळत असतो . नेमके कोण-कोणत्या प्रकरणी निवृत्तीनंतर प्रवास भत्ता मिळतो ? या संदर्भात सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

01.दि.22.11.1961 रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवेत असताना मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ( कुटुंबांना ) शासकीय कामकाज निमित्तासाठी  ( पेन्शन प्रकरणी ) आगाऊ प्रवास भत्ता देण्याचे निर्देश आहेत .

02. तसेच सेवेत असताना कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन प्रकरणांकरीता निवृत्तीनंतर देखिल प्रवास भत्ता अदा करण्याचे निर्देश आहेत . तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना सरकारच्या वतीने विभागीय चौकशी कामी करावा लागणार प्रवास याकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 20.06.2006 रोजीच्या निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे .

यांमध्ये निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना ते जरी निवृत्त असले तरी देखिल सरकारी कामकाजचा भाग म्हणून न्यायालयात अथवा विभागीय चौकशी प्रकरणी अधिकारी यांच्या समक्ष हजर रहावे लागते .

तथापि अशा निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर कामाकरीता उपस्थित राहणेकामी देय असणारा प्रवास भत्ता , दैनिक भत्ता , तसेच नियमानुसार विश्रामगृहात सवलतीच्या दरांमध्ये राहण्याची सोय उपलब्ध असेल .

अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता व दैनिक भत्ता विभाग विभागाच्या दिनांक 21.05.2005 रोजीच्या अधिसुचना नुसार विहीत दराप्रमाणे अदा करण्याचे निर्देश आहेत .

Leave a Comment