शिक्षक पात्रता परीक्षा गुणाची अट शिथिल करणे बाबत ; निवेदन पत्र !

Spread the love

Mh-Tv संगीता पवार प्रतिनिधी [ Regarding relaxation of Teacher Eligibility Test score condition; Letter of representation! ] : शिक्षक पात्रता परीक्षा गुणाची अट शिथिल करणे संदर्भात माननीय आमदार संजय केळकर , ठाणे शहर यांच्यामार्फत निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे .

सदर निवेदन पत्र राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री नामदार श्री. दादा भुसे यांच्या प्रति सादर करण्यात आले आहे . सदर निवेदन पत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजीच्या निर्णयाच्या अनुषंगाने सादर केलेला आहे .

या निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की , सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार , इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या शासकीय / निमशासकीय शिक्षकांना टीईटी /  सीईटीई परीक्षा बंधनकारक केलेली आहे .

त्याचबरोबर पदोन्नतीने पदोन्नती मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख / केंद्र समन्वयक / विस्तार अधिकारी (शिक्षण ) पदांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे .

अनेक सेवा जेष्ठ शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत , तर शिक्षक पात्रता परीक्षेत सर्वसाधारण संवर्गातील शिक्षकांना 150 पैकी 90 गुणांची अट आहे . तर त्यांच्या वयाच्या तसेच मानसिकतेचा व अभ्यासक्रमाचा विचार करता 150 पैकी 90 गुण ऐवजी 150 पैकी 60 गुणांची अट निश्चित करण्यात यावी असे , निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे .

Leave a Comment