Retirement Age : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे बाबत काही महत्वपुर्ण घडामोडी !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Some important developments regarding the retirement age of 60 years ] : सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत आत्ताच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .

निवृत्तीचे वय 02 वर्षांनी वाढणार का ? : केंद्र सरकार व इतर 25 राज्य सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे होणार ! अशी राज्य कर्मचाऱ्यांची धारणा आहे . परंतु वेळोवेळी राज्य सरकारचे केवळ आश्वासन ऐकून कर्मचारी देखिल सदर मागणीची आशा सोडून दिलेली आहे .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची आवश्यकता : बऱ्याच कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी फक्त 01 , 02 वर्षांनी हुकते , याशिवाय राज्य सरकारने नुकतेच राज्य केलेल्या सुधारित पेन्शन प्रणालीनुसार सेवा कालावधीनुसार पेन्शन अदा केले जाणार असल्याने , जेवढी सेवा अधिक तेवढी पेन्शनमध्ये भर पडणार आहे .

निवृत्तीचे वय वाढीस सरकार सकारात्मक आहे का ? : निवृत्तीचे वय वाढीकरीता राज्य सरकार सकारात्मक आहे परंतु , सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीस काही विधानसभा सदस्य तसेच स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनांचा विरोध असल्याने , सदर कर्मचाऱ्यांची मागणी पुर्ण होत नाही .

Leave a Comment