राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे जुलै 2025 पासून 58% दराने DA वाढ कधी मिळणार ?

Spread the love

Mh-Tv संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta vadh update ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै 2025 पासून 58% दराने महागाई भत्ता (DA) वाढ कधी मिळणार ; या संदर्भात राज्य कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

केंद्र सरकारी कर्मचारी प्रमाणे राज्यातील सरकारी , निमसरकारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी यांना दिनांक 01 जुलै 2025 पासून 3% महागाई भत्ता वाढ ( एकूण 58% प्रमाणे) डी.ए. वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव अद्याप पर्यंत प्रलंबित आहे .

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे विलंब : सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यामध्ये सद्यस्थितीत जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुका कार्यक्रम सुरू आहे . यामुळे राज्यात आचारसंहिताचे वातावरण कायम सुरू आहे .

यामुळे राज्य सरकारला महागाई भत्ता वाढ संदर्भात अधिकृत निर्णय घेता येत नाही . जानेवारी महिन्याच्या अखेरीस DA  वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती . परंतु दिनांक 05 फेब्रुवारी रोजी राज्यामध्ये जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत .

सदर निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर डी. ए वाढीचा अधिकृत निर्णय घेतला जाईल . म्हणजेच दिनांक 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

Leave a Comment