वेतन त्रुटी निवारण समिती : सुधारित वेतनश्रेणी लागू करणे संदर्भात GR निर्गमित दि.30.01.2026

Spread the love

Mh-Tv संगीता पवार प्रतिनिधी [ GR issued on 30.01.2026 regarding implementation of revised pay scale ] : वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या सुधारित वेतनश्रेणी लागू करणे संदर्भात , शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे की , वेतन त्रुटी समितीने वेतन निश्चिती निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणा बाबत केलेल्या शिफारशीपैकी शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शिक्षक संवर्गाशी संबंधित शिफारशीनुसार कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

यामध्ये काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी एस 13 मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन S 14 वेतनश्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक 01 जानेवारी 2016 रोजीची मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते .

अशाप्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी कमी होत असल्यास , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 मधील नियम 7 (१) नुसार त्याच वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहे .

याबाबत पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येत असताना , लेखा व कोषागार कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून त्यानंतरच वेतन निश्चिती अंतिम करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सुधारित वेतनश्रेणी व समितीच्या शिफारशी लागू करताना वित्त विभागाच्या दिनांक 02 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू राहतील असे नमूद करण्यात आले आहेत .

Leave a Comment