Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ 03 important GRs were issued , September 1st, regarding employees ] : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.सार्वजनिक बांधकाम विभाग : सहायक अभियंता श्रेणी – 02 ( स्थापत्य विभाग ) संवर्ग मधून उप – विभागीय अभियंता पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आलेल्या आदेशातील पदस्थापनेत अंशत: बदल करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
02.महसुल व वन विभाग : सहाय्यक वन संरक्षक गट अ ( कनिष्ठ श्रेणी ) या संवर्ग मधील तदर्थ पदोन्नत्या नियमित करणेबाबत , महसुल व वन विभाग मार्फत GR निर्गमित करण्यात आला आहे . यानुसार 31 अधिकाऱ्यांना तदर्थ पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे .
03.PSI पदावर विभागीय स्पर्धा परीक्षा मार्फत निवडीचे निकष : पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी पदभरतीचे प्रमाणे हे 50:25:25 असे निश्चित करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयेाग मार्फत ( सरळसेवा पद्धतीने ) 50 टक्के पदे भरली जातील .
तर 25 टक्के पदे हे MPSC मार्फत विभागीय स्पर्धा परीक्षा – पोलिस ( हवालदार , नाईक , शिपाई ) यांच्या साठी निश्चित करण्यात आले आहेत . तर उर्वरित 25 टक्के पदे हे पदोन्नती – यांमध्ये ज्येष्ठता व गुणवत्ताच्या आधारे निवडले जाणार आहेत .
विभागीय परीक्षा देण्यासाठी पोलिस ( हवालदार , नाईक , शिपाई ) या पदांवरील एस.एस.सी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांची दि.01 एप्रिल रोजी 06 वर्षांची नियमित सेवा पुर्ण झालेली असणे आवश्यक असेल . तसेच जे कर्मचारी HSC किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असतील त्यांची नियमित सेवा ही 05 वर्षे तर ज्यांची पात्रता ही पदवी / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असतील त्यांच्यासाठी शासन सेवेतील नियमित सेवा ही 4 वर्षांची असणे आवश्यक असेल .
या बाबतचे तीन्ही GR डाऊनलोड करणेकरीता Click Here