Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding rectification of outstanding payments in the year 2025-26 dated 26.02.2026 ] : सन 2025-26 मधील शालार्थ प्रणालीमधील ऑनलाईन थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत , अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह पथक ( माध्य ) यांच्यामार्फत दि.26.02.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , खाजगी अनुदानित माध्य. व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकीत देयके विहीत मार्गदर्शन तत्वानुसार व विहीत मार्गाने शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहेत .
त्यानुसार सदर देयके हे शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन व त्याची हार्ड कॉपी ऑफलाईन पद्धतीने वेतन पथक माध्यमिक कार्यालयास प्राप्त झालेली आहे . यानुसार सदर देयकांची वेतन पथक विविध स्तरावर छाननी करण्यात येत आहे .
ही छाननी करताना काही देयकांमध्ये त्रुटी असल्यास ही देयके त्या त्या स्तरावरुन ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या समोर दर्शविल्याप्रमाणे कारणाकरीता रिजेक्ट करण्यात आलेले आहेत .
त्यानुसार सदर देयकांची त्रुटी तुर्तता करुन तातडीने ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच त्रुटी पुर्ततेची हार्ड कॉपी कार्यालयांमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026