Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ 03 major financial benefits after retirement ] : सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक लाभ दिले जातात , त्यापैकी तीन प्रमुख आर्थिक लाभ व सदर लाभाचे गणना कसे करतात , याबाबतचे सुत्र या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .
01.निवृत्तीवेतन : जे कर्मचारी हे जुनी पेन्शन योजनांमध्ये मध्ये आहेत , त्यांच्यासाठी अर्हताकारी सेवेचे 20 वर्षे पुर्ण झालेल्यांना पुर्ण पेन्शनचा लाभ मिळेल . तर सुधारित पेन्शन योजनांमध्ये ( युपीएस / सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ) मध्ये कर्मचाऱ्यांची किमान सेवा ही 25 वर्षे पुर्ण होणे आवश्यक आहे . याशिवाय स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्यांना सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये पुर्ण लाभ मिळत नाहीत .
02.अंशराशीकरण ( Commutation of pension ) : अंशराशीकरण म्हणजे निवृत्तीवेतनाचे एकरकमी लाभ मिळविणे याकरीता मासिक पेन्शनचे रुपांतरण करण्यात येते . सदर लाभाची गणना करण्यासाठी = मुळ वेतन X 40% X 12 X अंशराशिकरणाचा सुधारित तक्तानुसार मुल्य .. असे सुत्र आहे .
03.सेवानिवृत्ती उपदान ( Retirement Gratuity ) : निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एकरकमी देण्यात येणारा आर्थिक लाभ म्हणजे सेवानिवृत्ती उपदान होय . सदरचा लाभ हा मुळ वेतनावर आधारित असतो . सदर रक्कम काढण्यासाठी सुत्र = शेवटचा मुळ वेतन X ( सेवाकाळ X 2 ) / 4
दि.01.09.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा 14 लाख रुपये वरुन 20 लाख रुपये अशी करण्यात आली आहे .
