राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.27.11.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major important government decisions (GR) were issued on 27.11.2025 regarding state employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांकडून 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR) निर्गमित करण्यात आलेले आहेत .

01.नोव्हेंबर वेतन अनुदान : माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत निधी वितरण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे .

02.थकीत वेतन अदा करणेबाबत : अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत विशेष शिक्षकांचे वेतन अदा करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे .

03.पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातुन सुट देणेबाबत : मंत्रालयीन कक्ष अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातुन सुट देणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत मंजूरी देण्यात आलेली आहे .

04.पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक ( माहिती ) वेतनश्रेणी S -23 व जिल्हा माहिती अधिकारी / जनसंपर्क अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / वरिष्ठ सहायक संचालक ( माहिती ) S – 20 या संवर्गातील पदे प्रतिनियुक्तीने भरणेकरीता इच्छुकता मागविण्यात येत आहेत .

या संदर्भातील क्रमनिहाय GR डाऊनलोड करण्यासाठी Click here

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment