Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 08 major important cabinet decisions were taken in the cabinet meeting held on September 16th. ] : दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 08 मोठे महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय घेण्यात आले आहेत .
01.निर्वाह भत्तामध्ये वाढ : सामाजिक न्याय विभाग अंतर्गत कार्यरत वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता मध्ये वाढ करण्यात आली आहे .सदर भत्ता हा स्तर निहाय वाढविण्यात आलेला आहे . यांमध्ये विभाग स्तर वसतिगृहासाठी 1500/- रुपये , जिल्हास्तर करीता 1300/- , तालुकास्तर करीता 1000/- तर स्वच्छता प्रसाधन भत्ता 150/- असे सुधारित भत्ता हा दिनांक 01.09.2025 पासुन देण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
02.गेमिंग , व्हिज्युअल इफेक्ट्स , महाराष्ट्र ॲनिमेशन , कॉमिक्स व एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण 2025 : राज्यात .गेमिंग , व्हिज्युअल इफेक्ट्स , महाराष्ट्र ॲनिमेशन , कॉमिक्स व एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण 2025 ला मंजूरी देण्यात आली आहे . यामुळे राज्यात आधुनिक तंत्रज्ञान आधारित नविन 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे .
03.उर्जा प्रकल्प : सतलज – महानिर्मिती या नदीवर जलविद्युत निगमची संयुक्त कंपनीस राज्यामध्ये 5000 हजार मेगावॅट क्षमतेचे नवीकरणीय उर्जा प्रकल्प उभारण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे .
04.शेतकरी भवन : राज्यभरात 79 बाजार समितीमध्ये नवीन 79 शेतकरी भवन उभारणीस तब्बल 132 कोटी 48 लाख रुपयांची तरतुद करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे .
हे पण वाचा : गट ड ( शिपाई ) पदांच्या 263 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती !
05.काटोल , नागपुर , मोर्शी , कळमेश्वर व संग्रामपुर येथे प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे .
06.भंडारा ते गडचिरोली असा एकुण 94 कि.मी लांबीचा द्रुतगती महामार्ग तयार करण्यासाठी भुसंपादन प्रक्रिया करीता एकुण 931 कोटी 15 लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
07.पायाभुत सुविधा या राज्याच्या उपसमितीला मंत्रीमंडळ समितीचा दर्जा देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
08.अकोला येथे दि निळकंठ सहकारी सुतगिरणीला अर्थसहाय्य करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे .

- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025