महिलांचे जीवन समृद्ध करणारी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ( PMMVY) अंतर्गत 6000/- रुपये लाभ – जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) to enrich the lives of women – know the details. ] : महिलांचे जीवन समृद्ध करणारी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत महिलांना आर्थिक लाभ प्रदान करण्यात येते .

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत एक मातृत्व लाभ योजना आहे . सदर योजनेच्या पात्रतेसाठी आधार कार्ड असणे आवश्यक असणार आहे . व आधार कार्ड हे बँक खात्यासाठी जोडले असावे. अन्यथा पोस्ट ऑफीस खात्यांमध्ये डायरेक्ट बेनिफीट हस्तांतरण द्वारे रक्कम जमा करण्यात येते .

आर्थिक लाभ कसे मिळते ? : पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाद्वारे रुपये 5000/- रुपये दोन हप्यांमध्ये दिले जाते .

हे पण वाचा : गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांच्या 290 रिक्त जागेसाठी महाभरती.

तर दुसरे अपत्य जर मुलगी जन्माला आल्यास अशा वेळी एकाच हप्त्यांमध्ये 6000/- रुपये इतकी आर्थिक रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातुन माताच्या खात्यांमध्ये जमा केली जाते .

पात्रता निकष : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे .

अर्ज कसा करावा ? : अर्ज करण्यासाठी आशा स्वयंसेविका / अंगणवाडी सेविका अथवा आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा .

Leave a Comment