Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employees to get 58% DA hike this month, as per Centre ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाचे औचित्य साधुन 3 टक्के डी.ए वाढ माहे जुलै 2025 पासुन डी.ए फरकासह लागु केली .
महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक 01.07.2025 पासुन 58% दराने डी.ए वाढ लागु केली आहे . त्याबाबत अधिकृत्त शासन निर्णय देखिल निर्गमित करण्यात आले आहे .
परंतु राज्यातील राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्राप्रमाणे डी.ए वाढ अद्याप लागु करण्यात आलेली नाही . राज्यांमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरु झाल्या आहेत .
निवडणुका आयोग मार्फत राज्यात आचार संहिता देखिल लागू केल्याने , राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांना डी.ए वाढीसाठी अजुन एक महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे . राज्यात माहे डिसेंबर महीन्यांच्या अखेर पर्यंत निवडणुक कार्यक्रम असेल .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
यामुळे डी.ए वाढीचा निर्णय हा डिसेंबर महिन्यांच्या अखेरीस निर्गमित होवू शकेल . म्हणजेच निवडणुकांचे कार्यक्रम संपल्याच्या नंतरच राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा अधिकृत्त निर्णय लागु केला जाईल .
डी.ए थकबाकी कधीपासुन मिळणार ? : राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 01.07.2025 पासुनच केंद्र सरकारप्रमाणे एकुण 58 टक्के दराने डी.ए वाढ व महागाई भत्ताची थकबाकी मिळणार आहे .
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025
