नविन वेतन आयोग बाबत वित्त मंत्र्याचे लोकसभेत स्पष्टीकरण : डी.ए /डी.आर विलिनीकरण तसेच फिटमेंट फॅक्टर बाबत मोठी माहिती !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Finance Minister’s clarification regarding the new Pay Commission: Big information regarding DA/DA merger and fitment factor ] : नविन वेतन आयोग बाबत वित्त मंत्र्याने दि.01.12.2025 रोजी लोकसभेत महत्वपुर्ण स्पष्टीकरण देण्यात आले आहे .

नविन वेतन आयोग संदर्भात विविध प्रश्न लोकसभा सदस्य आनंद भदौरिया यांच्याकडून विचारण्यात आले होते . सदर प्रश्नास काल दि.01.12.2025 रोजी केंद्रीय वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले आहे .

डी.ए /डी.आर मुळ वेतनात विलिन करण्यास नकार : श्री.आनंद भदौरिया यांनी विचारले होते कि , सध्या महागाईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे . तर सरकार विद्यमान डी.ए/डी.ए मुळ वेतनात विलीन करण्याचा विचार करत आहे का ? यावर वित्त मंत्र्यांने स्पष्ट केले कि , याबाबत सरकारचा अद्याप कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे नमुद केले .

डी.ए /डी.आर विलिनीकरण म्हणजे नेमके काय ? : सध्या सातवा वेनत आयोगांमध्ये जो डी.ए /डी.आर मिळत आहे . सदर रक्कम मुळ वेतनात विलीन केल्याने , सदर विलीनीकरण केलेली रक्कम नविन वेतन आयोगात मुळ वेतन ठरेल . परंतु यास केंद्र सरकार मार्फत अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे .

फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ : डी.ए/ डी.आर मुळ वेतनात विलिन करण्याचा सरकारचा विचार नसल्याने , सरकार फिटमेंट फॅक्टर मध्ये 2.00 ते 2.50 पट पर्यंत वाढ करु शकते .

यानुसार कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोगात सुधारित डी.ए / डी.आर तसेच वाहन भत्ता , प्रोत्साहन भत्ता , गणवेश भत्ता , घरभाडे भत्ता इ. दराने मिळणार आहेत . महागाई भत्ता हा ACPI-V च्या निर्देशांकाच्याच आधारे ठरविण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे .

Leave a Comment