सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढणार ; प्रस्ताव अंतिम टप्प्यात ..

Spread the love

Mh-Tv@24 खुशी पवार प्रतिनिधी [ Retirement age of government employees to be increased by two years ] : सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे दोन वर्षांनी वाढणार आहे . याबाबत सरकारने तयार केलेला प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे .

प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षांची वाढ केली जाणार आहे . सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे इतके आहे . त्यामध्ये आणखीन 02 वर्षांची वाढ करण्यात येणार आहे .

निवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबत प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त समोर येत आहे . सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर निवृत्तीच्या वयामध्ये वाढ केली जाणार आहे . याचा फायदा देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे .

निवृत्तीचे वय 62 वर्षे : सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे . त्यामध्ये आणखीन 02 वर्षांची वाढ केल्यास , सेवानिवृत्तीचे वय (Retirement age) वाढवून 62 वर्षे इतके होईल .

विद्यमान आयुर्मान वाढीमुळे निवृत्तीच्या वयात वाढीचा विचार : सध्या वैद्यकीय सोयी – सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्याने लोकांचे आयुर्मान वाढत आहे . यामुळेच सरकारी यंत्रणेमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा वापर करण्याकामी निवृत्तीच्या वयात वाढीचा विचार आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

या निर्णयामुळे देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना 02 वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल , याशिवाय नवीन निवृत्तीवेतन प्रणाली (New Pension scheme) अंतर्गत अतिरिक्त पेन्शन लाभ तसेच निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभ मध्ये वाढ होईल .

सदर प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त समोर येत असून , लवकरच सदर प्रस्तावास मंजुरी दिली जाईल . त्यानंतरच सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षांची वाढ होईल .

Leave a Comment