Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Now, changes will be made to the pay scales of these employees in the state. ] : सातवा वेतन आयोगानुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये तफावत होत्या , सदर तफावती दुर करण्यासाठी राज्य सरकारने खुल्लर समितीच्या अनुषंगाने समितीचे गठण करण्यात आले होते .
सदर समितीने ज्या पदांच्या वेतनश्रेणींमध्ये तफावती होत्या अशा , पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याची शिफारशी केल्या . परंतु अनेक पदांचा विचार खुल्लर समितीमध्ये करण्यात आला नाही . यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढला आहे .
राज्याचे हिवाळी अधिवेशन दरम्यान महसुल विभागातील तसेच राज्यातील लिपिक संघटना मार्फत विराट मोर्चा काढण्यात आला आहे . यावेळी सरकारच्या वतीने सकारात्मक आश्वासन देण्यात आले .
महसुल विभाग : महसुल विभागातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु होता , यावर महसुल मंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला . यांमध्ये महसुल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजुर करणे , विशेष वेतनवाढीचा प्रस्ताव तयार करणे , सुधारित वेतनश्रेणी लागु करणे , अशा विविध मागण्यांवर विशेष प्रस्ताव तयार करुन मंत्रीमंडळ बैठकीत सादर केला जाणार आहे .
लिपिक कर्मचाऱ्यांचा मोर्चा : राज्यातील लिपिक वर्ग पदांवर चौथ्या वेतन आयोगापासुनच अन्याय झाला असुन , सुधारित वेतनश्रेणी बाबत , खुल्लर समितीने कोणतीही शिफारस केली नाही . यामुळे अधिवेशनांवर लिपिक संघटना मार्फत विराट मोर्चा काढण्यात आला होता ..यावर सरकारने सकारात्मक आश्वासन दिले आहे .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025