Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major decisions were taken in the cabinet meeting.. ] : दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 04 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत . सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.नगरपरिषदा / नगरपंचायतीच्या अध्यादेश मध्ये सुधारणा : महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करुन थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार आहे . त्यांना त्यांच्या मताचाही अधिकार असणार आहे . यावेळी अध्यक्ष व सदस्य अशा दोन्ही पद एकावेळी धारण करु शकणार आहेत .
02.कर्मचायोगी 2.0 व सरपंच संवाद कार्यक्रम : सदर कार्यक्रम अंतर्गत गाव तालुका व जिल्हा अशा स्तरांवर राबविण्यात येणार आहे . यामुळे शेतकरी उत्पादक संघटना – एफपीओज यांसारख्या कृषी – संबंधित आर्थिक घटकांना भेडसावणाऱ्या समस्या दुर करण्यात येणार आहेत .
तसेच यांमध्ये थेट लोकांमध्ये जावून काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण केले जाणार आहेत . या अंतर्गत एकुण 85,000 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत .
03.ग्रामविकास विभाग : राज्यामधील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील कार्यरत असणऱ्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित 291 आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार आहेत .
04.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा करीता जागा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याकरीता धाराशिव नगरपरिष शहरातील दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली आहे .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025