सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Government employees will have to strictly follow these rules. ] : सरकारी कर्मचाऱ्यांना काही नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार आहे . अन्यथा नोकरी गमवावी लागेल . नेमका नियम काय आहे , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कार्यक्रम सुरु आहेत . यांमध्ये जर सरकारी कर्मचाऱ्यांना काही नियमावली घालुन देण्यात आलेल्या आहेत . सदर नियमांच्या चौकटीत राहुनच कर्मचाऱ्यांना काम करावे लागते .  

सरकारी कर्मचारी हा सरकारचा प्रतिनिधी असतो , त्यामुळे त्याला निवडणुक काळात एखाद्या उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रचार अथवा मोर्चामध्ये सामील होवू शकत नाही . अन्यथा त्यावर कठोर कारवाई होवू शकते .

सध्याच्या आधुनिक काळांमध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातुन पोस्ट , रील्स शेअर करणे , तसेच स्टेटस ठेवणे हे देखिल नियमांच्या विरुद्ध आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांने निदान निवडणुक काळांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय पोस्ट , स्टेटस , रील्स सोशल मिडीयावर शेअर करु नयेत .

याशिवाय एखाद्या राजकीय सोशल मिडीया ग्रुप मध्ये सामील होवू नयेत . अन्यथा आपल्यावर सदर गुन्हा सिद्ध झाल्यास नोकरीवरुन बडतर्फ केले जाईल . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांने सतर्क राहुन अशा प्रकारचा गुन्हा करु नयेत .

Leave a Comment