महाराष्ट्र राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ; GR दि.10.09.2025

Spread the love

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Important Government Circular issued for Maharashtra State Officers/Employees; GR dated 10.09.2025 ] : राज्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे हे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 07.05.2014 द्वारे निर्देशित करण्यात आलेले आहेत .

सदरच्या सुचनांचा पुनरुच्चार दिनांक 10.10.2023 रोजीच्या परिपत्रकानुसार करण्यात आला आहे . अशा प्रकारचे निर्देश सामान्य प्रशासन विभाग मार्फत देवूनही याची दखल अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत नाही .

ओळखपत्र हे दर्शनी भागात ( सर्वांनी स्पष्टपणे दिसेल असे – नाव , पदनाम , रुजु दिनांक , फोटो इ. ) लावणे आवश्यक आहे . परंतु ओळखपत्र हे दर्शनी भागात लावले जात नसल्याच्या तक्रारी येत असल्याने , प्रशासनांने पुढीलप्रमाणे सुचना दिल्या आहेत .

महाराष्ट्र राज्यातील सर्वच विभाग / आस्थापना मधील सरकारी अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाज सुरु असताना / कार्यालयांमध्ये प्रवेश करताना आपले ओळखपत्र हे दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असणार आहे .

तर जे अधिकारी / कर्मचारी दर्शनी भागांमध्ये ओळखपत्र लावणार नाहीत , अशांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची तरतुद सदर परिपत्रकांमध्ये करण्यात आलेली आहे .

Leave a Comment