New Pay Commission : आठवा वेतन आयोग मध्ये असे असतील विशेष बदल ; कर्मचाऱ्यांना आर्थिक व सेवाविषयक अतिरिक्त लाभ !

Spread the love

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ There will be special changes in the Eighth Pay Commission; Additional financial and service benefits for employees. ] नविन वेतन आयोग मध्ये काही विशेष बदल दिसुन येणार आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच आर्थिक अतिरिक्त लाभ प्राप्त होणार आहेत .

01.सेवाविषयक ( रजा ) : नुकतेच मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशष रजेचे संकल्पना मांडली आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांना आपल्या आई-वडीलांची काळजी घेण्यासाठी विशेष रजेचे तरतुद केली आहे . सदरची रजा ही पगारी रजा असणार आहे . याबाबत नविन वेतन आयोगांमध्ये स्पष्ट नियमावली जारी केली जाईल .

02.पगारवाढ : नविन वेतन आयोग म्हटले तर पगारांमध्ये मोठी वाढ होणार हे निश्चित आहे . आठवा वेतन आयोगांमध्ये किमान 2 पट फिटमेंट फॅक्टर वाढ प्रमाणे पगारात 8 ते 35 हजार पर्यंतची वाढ अपेक्षित आहे .

03.नविन वेतन आयोगात बाजारमुल्यांची सांगड : नविन वेतन आयोगांमध्ये बाजारमुल्यांची सांगड घालण्यास कर्मचारी युनियम मार्फत निवेदन दिले गेले आहेत . जसे कि वाहन भत्ता , घरभाडे भत्ता इ. हे भत्ते मुळ वेतनावर आधारित न देता बाजारमुल्यावर आधारित देण्याची मागणी करण्यात आलेली आहे . ज्यामुळे कमी वेतनश्रेणी असणाऱ्यांना महागाईशी सामाना करता येणार आहे .

04.अतिरिक्त ( ज्यादा ) काम : सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची तरतुद नाही , परंतु सरकारच्या अनेक आस्थापनामध्ये अतिरिक्त कामाचा बोजा अनेक कर्मचाऱ्यांवर दिला जातो . अतिरिक्त कामकाज करीता अतिरिक्त वेतनाची तरतुद आहे , परंतु ओव्हरटाईम काम करीता तरतुद नसल्याने , आता नविन वेतन आयोग मध्ये ज्यादा कामासाठी आर्थिक तरतुदीची मागणी कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेली आहे .

Leave a Comment