Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ : Statement showing the schedule for determination and authorization of pension and gratuity ] : सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेळेवर पेन्शन लाभ मिळत नाहीत , यामुळे निवृत्तीवेतन व उपदानाचे निर्धारण व प्राधिकरण करणेबाबतचे वेळापत्रक दर्शविणारे विवरणपत्र या लेखामध्ये सविस्तरपणे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
निवृत्तीवेतन विषयक कागदपत्र तयार करण्याचे काम हाती घेणे : नियम 120 नुसार नियत वयमान सेवानिवृत्तीच्या तारखेच्या दोन वर्षे अगोदर हे काम करता येतात .तसेच सेवेची पडताळणी व सेवापुस्तकातील उणीवा भरुन काढणे व निवृत्तीवेतनार्ह वेतनाची परिगणना करण्याचे काम हे सेवानिवृत्तीच्या दिनांकापुर्वी 08 महिने अगोदर हे काम पुर्ण करणे आवश्यक आहे .
नमुना 06 चा भाग 01 पुर्ण करणे : सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या 06 महीने अगोदर हे काम पुर्ण करणे आवश्यक असल्याचे नियम 122 मध्ये नमुद आहे .
तसेच शासनाला येणे असणारे रक्कमांचा तपशिल महालेखापालांना कळविण्याचे काम सेवानिवृत्तीच्या तारखेच्या 02 महिने अगोदर पोहोचणे आवश्यक असल्याचे नियम 124 मध्ये नमुद आहे .
हे पण वाचा : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना जुलै 2025 ची 4% DA वाढ निश्चित .
निवृत्तीवेतनाचे प्रदान : शासकीय कर्मचारी आस्थापनेवार असण्याचे बंद होईल त्या तारखेपासुन निवृत्तीवेतन प्रदेय होईल , तसेच उपदान प्रदान करणे – महालेखापालांनी निर्धारित केलेली व कळविलेली उपदानाची रक्कम शासनाला येणे असलेली कोणतीही रक्कम शासनांला येणे असलेली कोणतीही रक्कम समायोजित केल्याच्या नंतर कार्यालय प्रमुखाने संवितरीत करावी असे नमुद करण्यात आले आहे .
या बाबतचे सविस्तर विवरणपत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

