तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्तीवेतन बाबत 02 स्वतंत्र GR निर्गमित दि.16.09.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 02 separate GR issued on 16.09.2025 regarding Assured Progress Scheme and Pension under the revised service of three benefits ] : तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्तीवेतन संदर्भात दिनांक 16.09.2025 रोजी 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना : वित्त विभागाच्या दिनांक 02.03.2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार 10, 20 व 30 वर्षांच्या नियमित सेवा नंतरची 03 लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 01 जानेवारी 2016 पासुन लागु करण्यात आली आहे .

सदर निर्णयातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना तीन लाभाच्या ( 10 , 20  व 30 वर्षे ) नियमित सेवा नंतर पहिला , दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय असणार आहे . या अनुषंगाने राज्यातील विधी व न्याय विभाग अंतर्गत धर्मादाय संघटना..

 आस्थापनेवरील सहायक धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . याबाबतचा GR डाऊनलोड करण्यासाठी Click here

हे पण वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 800+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

02.निवृत्तीवेतन : दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी ज्यांची पदभरतीची जाहीरात अथवा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे व त्यांना दिनांक 01.11.2005 नंतर नियुक्ती दिली गेली आहे . अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या निर्णयाच्या अधिन राहुन जुनी निवृत्तीवेतन ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत निर्णय घेण्यात आला आहे .

ज्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आलेली आहे . अशांची यादी सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेली आहे . याबाबतचा GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment