सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण : नविन ( ८ वा ) वेतन आयोगाच्या काही प्रमुख वैशिष्ट्ये …

Spread the love

Mh-tv@24 खुशी पवार प्रतिनिधी [ Some key features of the new (8th) Pay Commission… ] : देशातील सरकारी यंत्रणांमधील शासकीय कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी महत्वपुर्ण बातमी समोर येत आहे , ती म्हणजे दिनांक 01.01.2026 पासुन लागु करण्यात येणार आठवा वेतन आयोगाबाबत काही प्रमुख वैशिष्ट्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

किमान मुळ वेतन : सातवा वेत आयोगांमध्ये किमान मुलभुत वेतन हे 7,000/- रुपये वरुन 18,000/- रुपये करण्यात आले होते , तर यांमध्ये मुळ वेतन हे मुळ ग्रहीत धरण्यात आले होते . प्राप्त माहितीनुसार आठवा वेतन आयोगांमध्ये किमान मुळ वेतन हे 35000-42000/- दरम्यान असू शकतो ,असे तज्ञांचे मत आहेत .

फिटमेंट फॅक्टर : सातवा वेतन आयोग हा 2.57 पट फिटमेंट फॅक्टरवर आधारित सेट करण्यात आलेला होता , तर आता आठवा वेतन आयोगांमध्ये हा फॅक्टर 2.86 पटवर सेट करण्याची शक्यता आहे .

महागाई भत्ता / घरभाडे भत्ता / टीए : सातवा वेतन आयोगांमध्ये सदर डी.ए , एच.आर.ए , टीए असे भत्ते हे किमान मुळ वेतनावर आधारित देण्यात येत आहेत . आता आठवा वेतन आयोगांमध्ये हे आधार बदलण्याची शक्यता आहे .

आठवा वेतन आयोगांमध्ये कार्यकुशल कर्मचाऱ्यांना वाढीव स्वरुपात वेतनाचे बक्षीस : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेवर आधारित वेतनवाढ किंवा आगाऊ वेतनवाढ बक्षीस देण्याची शक्यता आहे .

आठवा वेतन आयोग हा दिनांक 01.01.2026 पासुनच लागु करण्यात येईल , परंतु प्रत्यक्ष लागु होण्यास माहे सप्टेंबर -आक्टोंबर 2026 पर्यंतचा वेळ लागु शकतो .

Leave a Comment