Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Dear sisters will have to do the verification otherwise they will not get any more money ] : लाडकी बहीणींना आता आपली पडताळणी करावी लागणार आहे , अन्यथा यापुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत . याबाबत महिला व बाल विकास विभाग मार्फत दिनांक 18.09.2025 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांची पडताळणी आधार ऑथेंटिकेशन मार्फत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .
सदरची ई केवायसी प्रक्रिया ही सदर निर्णय निर्गमित होण्यापासुन 02 महिन्यात पुर्ण करायची आहे . सदर पडताळणी न केल्यास , यापुढील हप्ते मिळणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
ई-केवायसी कसे कराल ? : सदर ई-केवायसी करण्याठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी , त्यामध्ये ई-केवायसी बॅनेर वर क्लिक करावेत . व त्यानंतर ई-केवायसीचा फॉर्म उघडेल त्यामध्ये आपले आधार क्रमांक टाकून सांकेतांक कोड ( कॅप्चा ) टाकुन सबमिट केल्यास आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल .
जर ई-केवायसी पुर्ण नसेल तर आपल्या मोबाईलवर ( आधार लिंक ) आलेला ओटीपी टाकुन सबमिट या बटणवर क्लिक करावेत . त्यानंतर ई-केवायसी पुष्ठावर पती / वडील यांचा आधार क्रमांक नमुद करुन पडताळणी सांकेतांक कोड नमुद करुन आधार प्रमाणीकरण संमती दर्शवून सेंट ओटीपी या बटणवर क्लिक करावेत .
त्यानंतर पती / वडीलांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी टाकुन सबमिट या बटणवर क्लिक करावेत . त्यानंतर लाभार्थ्याची जात , व स्वयंघोषणापत्र त्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / मंडळ / भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही स्थानिक संस्थामध्ये कार्यरत नाही अथवा निवृत्तीवेतनधारक नाही ( होय / नाही ) हे ऑप्शन क्लिक करायचे आहेत .
त्यानंतर माझ्या कुटुंब मधील फक्त 01 विवाहीत व 01 अविवाहीत महिला लाभ घेत आहे , ( होय / नाही ) या ऑप्शनवर क्लिक करुन शेवटी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहेत .
त्यानंतर आपणांस ई-केवायसी यशस्वीरित्या पुर्ण झाल्याचा संदेश येईल .

- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025