राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.09.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay dated 19 September ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , वाहन चालक , या संवर्गास सेवाप्रवेश नियमांच्या तरतुदी लागु : राष्ट्रीय छात्र सेना कार्यालय अंतर्गतर येणाऱ्या लघुलेखक ( उच्चश्रेणी ) , कनिष्ठ लिपिक , वाहन चालक , या संवर्गाकरीता सामान्य प्र.विभागाच्या अधिसुचनेतील सेवाप्रवेश नियमांच्या तरतुदी लागु करण्यास शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

02.कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग मधील मंजूर आकृतीबंधातील नियमित वाहन चालक या पदावर समायोजनाने नियमित करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मंजूरी देण्यात आली आहे .

03.अधिसंख्य पदावर नियुक्ती : सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 04.10.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावरील अधिकारी / कर्मचाऱ्यांना 01 दिवसांचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .

यानुसार अधिसंख्य पदावरील अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिनांकापर्यंत दर 11 महिन्यांनी सेवेत 01 दिवसाचा तांत्रिक खंड देवून सेवा पुढे सुरु ठेवणेबाबतचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद लातुर अंतर्गत पदभरती 2025 ; अर्ज करायला विसरु नका .

04.पदोन्नती : महाराष्ट्र कृषी सेवा गट अ , कृषी उपसंचालक संवर्ग मधील तदर्थ पदोन्नती नियमित करणेबाबत कृषी व पदुम विभागांकडून मंजूरी देण्यात आली आहे .

05.वेतन निधी अनुदान : सचिवालय सामाजिक सेवा , सचिवालय शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन करीता अनुदानाचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

वरीलपैकी पाचही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment