Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ govt. employee mahagai Bhatta update ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी महागाई भत्ता वाढ बाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे .
केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2025 पासुन 55 टक्के दराने डी.ए वाढ लागु आहे . आता माहे जुलै 2025 मध्ये परत डी.ए वाढ होणार आहे . डी.ए वाढीसाठी ऑल इंडीया ग्राहक निर्देशांकाचा आधार घेण्यात येत असतो .
नुकतेच केंद्रीय कामगार विभाग मार्फत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे . सदर निर्देशांकाचा आधारे डी.ए मध्ये मोठी वाढ होणार आहे . सातवा वेतन आयोगानुसार सदर डी.ए वाढ ही अंतिम डी.ए वाढ असणार आहे .
किती डी.ए वाढ होणार ? : ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे माहे जानेवारी ते जुन 2025 पर्यंत 1.80 निर्देशांकाचा फरक दिसुन आला आहे . त्यानुसार डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे .
हे पण वाचा : पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 7,565 पदासाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
सदर 4 टक्के डी.ए वाढीमुळे केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना जुलै 2025 पासुन एकुण 59% दराने महागाई भत्ता मिळेल . सदरचा लाभ हा जुलै 2025 पासुन डी.ए थकबाकीसह अदा केला जाईल .
कधीपासुन लागु होईल ? : सदरचा डी.ए वाढ हा दिवाळी सणापुर्वीच म्हणजेच पुढील महीन्यात याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत्त घोषणा केली जाईल . व ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत सदर डी.ए वाढ लागु केली जाईल .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025