गट क व ब संवर्गातील कर्मचाऱ्यांना 30 दिवस पगार इतका दिवाळी बोनस जाहीर ; जाणुन घ्या सविस्तर ..

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Diwali bonus equal to 30 days salary announced for Group C and B cadre employees ] : दिवाळी सणाच्या निमित्त कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे . सदर बोनस हा पगाराच्या 30 दिवस पगर इतका निश्चित करण्यात आलेला आहे .

सदर बोनस हा केंद्र सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे , मागील वर्षी सदर बोनस हा 6,908/- रुपये इतका निश्चित करण्यात आलेला होता .यंदाच्या वर्षी गट क व गट ब  कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचे वेतन ( वेतन – बेसिक ) नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस दिला जाणार आहे .

बोनस किती मिळणार ? : यंदाच्या वर्षी केंद्र सरकारच्या गट क व गट ब संवर्गातील अधिकारी  / कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक वेतनाच्या 30 दिवसाच्या पगार इतका बोनस मिळणार आहे . यांमध्ये बेसिकचा ( मुळ वेतन ) उपयोग केला जाणार आहे .

सदर मासिक वेतनाची कमाल मर्यादा ही 7000/- रुपये इतकी निश्चित करण्यात आलेली आहे . त्यावर आधारित बोनस दिला जाणार आहे . म्हणजेच सरासरी वेतन व 7000/- यापैकी जी रक्कम कमी असेल , ती रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस म्हणुन दिली जाणार आहे .

हे पण वाचा : सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर वेतनातून होणार एक दिवसाचा पगार कपात ..

पात्रता : सदर बोनसचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याची दिनांक 31.03.2025 रोजी किमान 06 वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक असेल . तसेच सशस्त्र दल तसेच निमलष्करी दल अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना बोनस लागु असणार आहे . तसेच केंद्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना देखिल बोनस लागु असेल .

ज्या कर्मचाऱ्यांना संपुर्ण वर्षे सेवा दिलेली नाही , अशांना प्रो- राटा तत्वानुसार बोनस दिला जाणार आहे . याशिवाय मागील तीन वर्षांपासुन कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1184/- रुपये इतका दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे .

Leave a Comment