महागाई भत्ता वाढीचा निर्णय येत्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्तावित ; ( 3% ते 4% DA वाढीची शक्यता .)

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Decision on increase in dearness allowance proposed in upcoming cabinet meeting ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डी.ए वाढीबाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे येत्या मंत्रीमंडळ बैठकीत डी.ए वाढीबाबतचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे .

इंडिया टुडे च्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या बुधवारी केंद्र सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक आयोजित केली जाणार आहे . सदर बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीचा निर्णय प्रस्तावित आहे .

दिनांक 01.07.2025 पासुन केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ लागु करण्यात येणार आहे . यामुळे दिवाळी सणापुर्वीच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे .

ऑक्टोंबर वेतनासोबत डी.ए वाढीचा लाभ : येत्या बुधवारी सदर डी.ए वाढीबाबतचा निर्णय झाल्यास , सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत डी.ए वाढ लागु करण्यात येईल . यांमध्ये माहे जुलै पासुन डी.ए वाढीची थकबाकी देखिल अदा करण्यात येईल .

3 ते 04 टक्के पर्यंत होणार वाढ : ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे जुलै 2025 04 टक्के डी.ए वाढ होणे अपेक्षित आहे , परंतु सरकार किमान 03 टक्के ते 04 टक्के पर्यंत महागाई भत्ता वाढ लागु करेल .

केंद्र सरकरच्या निर्णयानंतर माहे डिसेंबर पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना देखिल सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर डी.ए वाढ लागु केला जाईल .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ( कर्मचारी विषयक )  शासन निर्णय PDF स्वरूपात पुस्तिका फक्त 110/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी  Click Here

Leave a Comment