OPS : जुनी पेन्शन योजना सर्वांना लागु होणार ; सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल अंती केंद्र सरकारचा मोठा निर्णय !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ OPS: Old pension scheme will be applicable to everyone ] : सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे , याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाअंती केंद्र सरकार मार्फत मोठे आश्वासनात्मक पाऊल घेण्यात आले आहेत .

सध्या जुनी पेन्शन योजना सुरु असणारे राज्य : सध्या देशांमध्ये पश्चिम बंगाल , हिमाचल प्रदेश , छत्तीसगड , राजस्थान , पंजाब या पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरु आहे , सदर राज्यांनी एनपीएस प्रणाली रद्द करुन परत जुनी पेन्शन योजना सुरु केली आहे .

जुनी पेन्शन योजना बाबत केंद्र सरकारचे ऐतिहासिक निर्णय : पेन्शन बाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे कि , पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा विशेषाधिकार नसुन त्यांचा हक्क आहे . पेन्शन हा वृद्धपकाळामधील आर्थिक व सामाजिक सुरक्षितेचा विषय आहे . यामुळे सरकारला जुनी पेन्शन योजना सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

2026 पासुन जुनी पेन्शन : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारमार्फत असे जाहीर केले आहे कि , 2026 पासुन जुनी पेन्शन लागु करण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी केले जाईल असे निर्देश देण्यात आले आहेत .

यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखिल निवृत्तीनंतर सामाजिक व आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार आहे . याशिवाय सन 2029 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत , त्या अनुषंगाने जुनी पेन्शन हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा विषय होणार असल्याने , सरकारला याबाबत उचित निर्णय घ्यावाच लागणार आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ( कर्मचारी विषयक )  शासन निर्णय PDF स्वरूपात पुस्तिका फक्त 110/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी  Click Here

Leave a Comment