अखेर महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारप्रमाणे 3% महागाई भत्ता वाढ ( 58%) करणेबाबत अधिकृत्त GR निर्गमित दि.20.10.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Government finally issues official GR regarding 3% dearness allowance increase (58%) as per Central Government ] : केद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 01.07.2025 पासुन 03 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत , निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारमार्फत दिनांक 20.10.2025 रोजी दोन अधिकृत्त शासन निर्णय निर्गिमित करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता .

सामान्य प्रशासन विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र सरकारच्या कार्मिक , लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय तसेच निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक 06.10.2025 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार महाराष्ट्र राज्य …

संवर्गातील आखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकारी संदर्भात माहिती व योग्य ती कार्यवाही करीता अग्रेषित करण्यात आलेली आहे .

सदर ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक 01.07.2025 पासुन लागु करण्यात आलेला 03 टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनांमध्ये नमुद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागु करण्यात आले आहेत .

तसेच त्यानुसार दिनांक 01.07.2025 पासुन 58 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .

राज्यातील निवृत्तीवेतनधारकांना 58% दराने डी.ए वाढ लागु करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment