Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ DA increase of 58% will be applicable to pensioners in Maharashtra state from 01.07.2025.] : महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58 टक्के दराने डी.ए वाढ लागु करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 20.10.2025 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र सरकारच्या कार्मिक व लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय , निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक 08.10.2025 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही माहराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील..
निवृत्ती वेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक अधिकारी संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही करीता अग्रेषित करण्यात आलेली आहे .
यानुसार केंद्र सरकारच्या कार्मिक , लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या सदर नमुद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 01.07.2025 पासुन लागु करण्यात आलेली 3 टक्के महागाई भत्तातील दरवाढ व ज्ञापनांमध्ये नमुद करण्यात आलेल्या इतर तरतुदी ..
महाराष्ट्र संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतन धारकांना / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही लागु असणार आहेत . तसेच यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना / कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना दिनांक 01.07.2025 पासुन 58 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025
