राज्यातील ज्येष्ठ नागरिक , विधवा , दिव्यांगांना दरमहा 2500/- रुपये अर्थसहाय्य ; मंत्रीमंडळ निर्णय दि.03.09.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Financial assistance of Rs. 2500/- per month to senior citizens, widows, and disabled in the state; Cabinet decision dated 03.09.2025 ] : राज्यातील ज्येष्ठ नागरिक , विधवा तसेच दिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींना दरमहा 2500/- रुपये अर्थसहाय्य देणेबाबत दि.03.09.2025 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे .

राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना तसेच अनाथ मुले , विधवा महिला यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत दरमहा 1500/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते . सदर योजना अंतर्गत आता अर्थसहाय्याची रक्कम वाढविण्यात आली आहे .

राज्यात सदर संजय गांधी निराधार योजना अंतर्गत एकुण 4,50,700 लाभार्थी आहेत , तर श्रावणबाळ योजना अंतर्गत राज्यात एकुण 24,000 लाभार्थी आहेत . सदर लाभार्थींना दरमहा 1500/- रुपये अर्थसहाय्य दिले जात होते , आता यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे .

आता दरमहा 2500/- रुपये अनुदान : सध्याच्या महागाईचा विचार करता सदर लाभार्थ्यांच्या अनुदानांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे . आता वरील सर्व लाभार्थ्यांना दरमहा 2500/- रुपये दरमहा अर्थसहाय्य दिले जाणार आहेत .

सदरचे अर्थसहाय्य हे माहे ऑक्टोंबर 2025 पासुन लागु केले जाणार आहेत , याकरीता 570/- कोटी रुपयांची अतिरिक्त तरतुद देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

Leave a Comment