प्रत्येक कुटुंबात 01 सरकारी नोकरी , कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन , महिलांना प्रतिमहा 2500/- रु. इ. इंडिया गठबंधनचा जाहीरनामा !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 01 government job in every family, old pension for employees, Rs. 2500/- per month for women etc. India Alliance manifesto. ] : बिहार राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे .

यांमध्ये इंडिया गठबंधनचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे . यांमध्ये नागरिकांना आकर्षण करण्यासाठी महिलांना प्रतिमहा 2500/- रुपये देण्याचा संकल्प करण्यात आला आहे .सदर जाहीरनामा मधील मुख्य बाबी पुढीप्रमाणे जाणून घेवूयात ..

कर्मचाऱ्यांना पेन्शन : इंडिया गठबंधनचे सरकार आल्यास , राज्य कर्मचाऱ्यांना पुर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना सुरु करण्याचा संकल्प करण्यात आला आहे . यामुळे निश्चित कर्मचारी याकडे वळतील असा अंदाज आहे .

दरमहा आर्थिक सहाय्य : महिलांना दरमहा 2500/- रुपये दिले जातील , तसेच विधवा व वयोवृद्धांना 1500/- रुपये दरमहा पेन्शन देण्यात येईल , याशिवाय यांमध्ये दरवर्षी 200/- रुपयांची वाढ करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहे . याशिवाय दिव्यांगाना 3000/- रुपये दरमहा पेन्शन देण्याचा जाहीरानामा मध्ये नमुद करण्यात आले आहे .

हे पण वाचा : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत विविध पदांच्या 258 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरी : इंडीया गठबंधनचे सरकार स्थापन झाल्यास , पुढील 20 दिवसात प्रत्येक कुटुंबात 01 सरकारी नोकरी देण्याचा अधिनियम जाहीर केले जाईल असे जाहीरनामा मध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत .

200 युनिट पर्यंत मोफत वीज : 200 युनिट पर्यंत नागरिकांना मोफत वीज देण्याचा संकल्प करण्यात आला आहे .

Leave a Comment