TET प्रमाणपत्र माहिती शिवाय माहे ऑक्टोंबर 2025 चे वेतन नाही ; महत्वपुर्ण आदेश निर्गमित दि.27.10.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ No salary if you don’t pass TET; Important order issued on 27.10.2025 ] : शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असले बाबत सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण लातुर मार्फत दिनांक 27.10.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहेत .

जे सेवेत असलेले शिक्षक आरटीई कायदा लागू होण्यापुर्वी भरती झाालेले आहेत व ज्यांना निवृत्तीपर्यंत 05 वर्षांपेक्षा जास्त सेवा उरलेली आहे , त्यांच्यासाठी 02 वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार आहे .

विहीत मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न केल्यास , त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येणार आहेत . अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाणार असून जेवढे हक्काचे निवृत्तीपश्चात लाभ आहेत ते दिले जाणार आहेत . मात्र निवृत्ती लाभ मिळविण्यासाठी शिक्षकाने नियमांनुसार आवश्यक सेवाकाल पुर्ण केलेला असणे आवश्यक असेल .

ज्या शिक्षकांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या नंतर नियुक्ती दिलेली आहे , अशा शिक्षकांचे प्रमााण्पत्र व टीईटी प्रमाणपत्र दिनांक 28.10.2025 पर्यंत कार्यालयास मुख्याध्यापक यांनी स्वत : उपस्थित राहुन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदरची माहिती सदर कार्यालयास प्राप्त झाल्याशिवाय माहे ऑक्टोंबर 2025 चे वेतन देयक अदा करण्यात येणार नसल्याची स्पष्ट करण्यात आले आहेत . तसेच ज्या कर्मचारी यांनी मा.न्यायालयात याचिका दाखल केलेली असुन त्यानुसार मा.न्यायालयाने स्थगिती दिलेला असेल तर सदर स्थगिती दिलेल्या आदेशाची प्रत सदर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment