Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ According to the Labor Code, women will get safety, increased working hours, and increased overtime pay. ] : नविन कामगार संहिता नुसार महिला कामगारांना अधिक सुरक्षिता तसेच कामाचे तासात वाढ व ओव्हरटाईमचा वाढीव मोबदला मिळणार आहे .
कामाच्या ठिकाण महिलांना अधिक सुरक्षिता मिळावी , या दृष्टीने नविन कामगार संहिता मध्ये तरतुद करण्यात आलेली आहे , कारण आता सुधारित संहिता नुसार महिलांना देखिल नाईट ड्युटी देता येणार आहे . परंतु तशी सुविधा देणे आवश्यक राहील .
कामाच्या तासात वाढ : नविन कामगार संहिता नुसार कारखाना मध्ये काम करणाऱ्या कामगारांना कामाचे तास हे 09 तास होते , आता हे तास वाढवुन 12 तास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . परंतु 9 तासापेक्षा अधिक कामाचा अतिरिक्त मोबदला द्यावा लागणार आहे .
सदरचा नियम हा ज्या ठिकाणी 20 व त्यापेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत , अशा ठिकाणी ही नियमावली लागेल . एकंदरित कामाचा तास वाढविणे हे अतिरिक्त काम करणाऱ्यांना फायदेशिर आहे , ज्यामुळे त्यास ओव्हरटाईमचा अतिरिक्त मोबदला मिळणार आहे .
त्याचबरोबर पुर्वीपेक्षा अधिक वेळ ओव्हरटाईम करता येणार आहेत . तसेच ओव्हरटाईम केला असेल , अशा वेळी सदर कर्मचाऱ्यांस बदली सुट्टी द्यावी लागणार आहे . ज्यादा तास काम करुन घेण्यासाठी सरकारची पुर्व परवानगी घेणे आवश्यक असेल .अधिक काम / ओव्हरटाईम कामगारांकडून करवुन घेण्याकरीता सरकारची पुर्वपरवानगी घ्यावे लागेल .