राज्यातील “या” कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त भाऊबीज भेट रक्कम प्रदान करण्यास मंजूरी ; GR निर्गमित दि.25.09.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Approval to provide Bhaubij gift money to these employees in the state on the occasion of Diwali festival ] : राज्यातील खाली नमुद कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्त भाऊबीज भेट देण्यासाठी निधीची रक्कम मंजुर करणेबाबत दिनांक 25.09.2025 रोजी महिला व बाल विकास मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा मार्फत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर कार्यरत असणाऱ्या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात प्रत्येकी 2,000/- रुपये इतकी रक्कम भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे .

दरवर्षी दिवाळी सणाला भाऊबीज भेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येत असते , त्यानुसार यंदाही सदर भाऊबीज भेट अदा करण्यासाठी पोषण आहार , बाल विकास सेवा , सहाय्यक अनुदाने या लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .

हे पण वाचा : कॅनरा बँकेत तब्बल 3500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

याकरीता एकुण 40.6130/- कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . त्यानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट तात्काळ अदा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

याबाबतचा सविस्तर GR खालीलप्रमाणे ..

ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा ..

Leave a Comment