कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके दि.31.12.2025 पर्यंत अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.19.11.2025

Spread the love

Mh-Tv@24 चंदना पवार प्रतिनिधी [ Circular regarding payment of outstanding salary payments issued on 19.11.2025 ] : थकीत वेतन अदा करणेबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दि.19.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित आलेला आहे .

सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि, थकीत वेतन देयके हे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . शालार्थ प्रणाली सन 2025-26 मध्ये थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

त्या अनुषंगाने शालार्थ प्रणालीवर थकीत देयके सादर करण्यास सचित करण्यात आले आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , अनुदानाची देयके योग्यरित्या तपासल्यानंतर मंजूर करण्यात आलेले थकीत देयके अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदर प्रलंबित थकीत देयके भरण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असणार आहे . थकीत देयकांमध्ये वैयक्तिक मान्यता / वरिष्ठश्रेणी / न्यायालयीन आदेश / अनुदानाअभावि थकीत देयके इ.समावेश असणार आहे .

थकीत देयकांचे प्रकार :

01.पदोन्नती
02.वेतनवाढ
03.निवडश्रेणी
04.शिक्षण सेवक मानधन
05.महागाई भत्ता फरक
06.6 वा ,7 वा वेतन आयोग फरक
07.निलंबन / बडतर्फ कालावधीतील फरक
08.न्यायालयीन प्रकरणे
09.पवित्रद्वारे नियुक्त असल्यास
10.नियमित वेतनश्रेणी फरक
11.वरिष्ठ वेतनश्रेणी

यांमध्ये केवळ 01 ते 06 वर्षे व 06 वर्षापेक्षा जास्त कालावधी असणारे देयके दि.31.12.2025 पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

या संदर्भातील सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी Click here

Leave a Comment