Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या निदेशानुसार मतदान यंत्रणा अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करणे संदर्भात दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे .
01. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मानधनामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून , आता त्यांना प्रतिवर्षी 6,000/- वरून 12,000/- रुपये इतके मानधन वाढ करण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर त्यांना निर्धारित करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये मतदान पडताळणी करण्याकरिता दिला जाणारा भत्ता 1000/- वरून दोन हजार रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता वार्षिक इतकी वाढ करण्यात आली आहे .

02. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक ( BLO supervisor ) : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक ( BLO supervisor ) दरवर्षी 12,000/ इतके मानधन अदा केले जाते आता सुधारित दरानुसार हे मानधन 18,000/- रुपये इतके करण्यात आली आहे .
सदरचे सुधारित मानधन व भत्त्याचे दर दि.01 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्याचे निर्देश सदर शासन निर्णय (GR ) नुसार नमूद करण्यात आलेली आहे .
