Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Government decision regarding payment of arrears of salary issued on 06.11.2025 ] : थकित वेतन अदा करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 06.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार मा.उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्र.10677/2016 मध्ये अवमान याचिका क्र.568/2017 व इतर संलग्न याचिका मधील विशेष शिक्षक यांना मानधन अदा करणे कामी शिक्षण संचालक ( प्राथमिक ) , महाराष्ट्र राज्य …
पुणे यांना पुढीलप्रमाणे एकुण 2,58,44,856/- ( अक्षरी – दोन कोटी अठ्ठावण्ण लाख चव्वेचाळीस हजार आठशे छप्पन्न रुपये फक्त ) इतका निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे .

यानुसार नियुक्ती दिनांक ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे वेतन अदा करणे कामी अनुदान वितरीत करण्यात आले आहेत . तसेच माहे सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतचे मानधन अदा करणेकामी निधीचे वितरण करण्यात आले आहेत .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
थकीत मानधन / मानधनाची रक्कम ही संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच याबाबत कोणतीही अनियमितत झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .
निधीचे वितरण करताना वित्त विभागाचे दिनांक 07 एप्रिल 2025 रोजीच्या शासन परिपत्रकातील सर्व अटींची पुर्तता करणे आवश्यक राहील .


सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025
