कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असलेले वयाधिक्य क्षमापित करणेबाबत GR निर्गमित दि.09.02.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 09.02.2026 regarding waiver of age limit on the date of first appointment of employees. ] : कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारे वयाधिक्य क्षमापित करणेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत दि.09.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार राज्यतील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची विहित कार्यपद्धतीने नियुक्ती झाली आहे , तसेच जे कर्मचारी इतर विहीत शैक्षणिक अर्हतांची पुर्तता करतात व न्यायालयीन प्रकरणांशी समानरित्या स्थित आहेत , अशा अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ..

45 कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारे वयाधिक्य क्षमापित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .तसेच सदर मान्यता ही केवळ वयाधिक्य क्षमापित करणेबाबत आहे , संबंधित कर्मचाऱ्याची सेवाविषयक व निवृत्तीविषयक बाबींवर शासनांच्या प्रचलित नियमांच्या आधारे कार्यवाही करणे आवश्यक राहील असे नमुद करण्यात आले आहेत .

त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली वयाधिक्य क्षमापित करण्याबाबतची मान्यता एक अपवादात्मक बाब असुन या प्रकरणाचा कोणत्याही परिस्थितीत पुर्वोदाहरण म्हणून वापर करण्यात येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment