Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 14.11.2025 regarding changes in Orphan Reservation Policy ] : अनाथ आरक्षण धोरण मध्ये बदल करणेबाबत महिला व बाल विकास विभाग मार्फत दिनांक 14.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर शासन पुरकपुत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , उपलब्ध पदांच्या 01 टक्के अशा उल्लेखा ऐवजी रिक्त पदाच्या 01 टक्के असे सुधारणा करण्यात आले आहे . तसेच अनाथ आरक्षण पात्रता निकष मध्ये संस्थात्मक या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची 18 वर्षे पुर्ण होण्यापुर्वीच त्यांच्या आई – वडील यांचे निधन झाले आहेत .
व ज्यांचे शासन मान्यता प्राप्त संस्थामध्ये पालन – पोषण झाले आहे . अशा बालकांचा समावेश असणार आहे . तसेच आई – वडील असा उल्लेख ऐवजी जैविक आई – वडील असे वाचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच आरक्षण स्वरुप मध्ये अनाथ आरक्षणाची अंमलबजावणी दिव्यांग आरक्षणाच्या धर्तीवर करण्यात येईल या ऐवजी अनाथ आरक्षण करीता दिव्यांग आरक्षणानुसार कप्पीकृत समांतर आरक्षण धोरणा ऐवजी एकुण समांतर आरक्षण हे तत्व स्विकारण्यात येत आहे .अशी सुधाारणा करण्यात येत आहे .
तसेच सरकारी अथवा निमसरकारी पदभरती प्रक्रिया मध्ये अनाथ प्रवर्गास एकच पद उपलब्ध असेल तर ते पहिल्या भरतीमध्ये संस्थात्मक प्रवर्गास उपलब्ध करुन देण्याचे व पुढील भरतीमध्ये संस्थाबाह्य प्रवर्गास उपलब्ध करुन देण्यात यावे असे नमुद करण्यात आले आहेत .
जर अनाथ प्रवर्गाच्या प्रतिक्षा यादीमधील पुढील उमेदवार हा इतर सामाजिक प्रवर्ग मधील असल्यास , व त्या प्रवर्गा करीता प्रतीक्षा यादीच्या वैध कालावधीमध्ये सदर सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पद रिक्त झाले तर सामाजिक प्रवर्ग मधील प्रतीक्षा यादीमधील उमेदवाराच्या ऐवजी अनाथ प्रवर्ग करीता प्रतीक्षा यादीमधील उमेदवारास प्राधान्याने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
हे पण वाचा : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 122 रिक्त जागेसाठी पदभरती !
तसेच अनाथ आरक्षण करीता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास , अनाथ आरक्षण करीता उपलब्ध करुन देण्यात आलेले पद हे केवळ त्या जाहिरातीपुरते मर्यादित राहील असे नमुद करण्यात आले आहेत .


- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025