राज्य कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून निवृत्तीवेतन निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.19.12.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 19.12.2025 regarding determination of pension to state employees taking into account hypothetical salary increment ] : राज्य कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून निवृत्तीवेतन निश्चित करणेबाबत , वित्त विभाग मार्फत दिनांक 19.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

सदर शासन निर्णयानुसार , नमुद करण्यात आले आहे कि , दिनांक 29 जुन 2023 रोजीच्या वित्त विभागाच्या शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने दिनांक 30 जुन रोजी निवृत्त होणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करण्यात आलेली आहे .

त्याच धर्तीवर दिनांक 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणा-या राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करण्यास सदर निर्णयानुसार मंजूरी देण्यात आली आहे .

यानुसार वित्त विभागाच्या दिनांक 28.06.2023 रोजीच्या शासन परिपत्रकातील सुचना ह्या दिनांक 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्यांना देखिल लागु करण्यात येत आहेत . तसेच सर्व विभागांनी दिनांक 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत दिनांक 28.06.2023 रोजीच्या शासन परिपत्रकातील सुचनांप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

दिनांक 01 जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतुद 7 व्या वेतन आयोगात दिनांक 01 जानेवारी 2016 पासुन अंमलात आली असल्याने , सदर तरतुद केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 01 जानेवारी 2016 पासुन लागु करण्यात येत आहे .

Leave a Comment