सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत GR निर्गमित दि.19.12.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 19.12.2025 regarding implementation of revised pay scale ] : वेतन समानीकरणच्या ( 4 था वेतन आयोग ) अहवालानुसार , सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयांमध्ये स्वीय सहायक संवर्गाचे पद निर्माण करण्यात येवून त्यास मंत्रालयीन निवडश्रेणी लघुलेखकांची वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे .

तसेच वेतनत्रुटी निवारण समिती 2024 ( खुल्लर समिती ) च्या शिफारशीनुसार वित्त विभागाच्या दिनांक 02 जुन 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ व पोलिस महासंचालक कार्यालयातील  स्वीय सहायक या संवर्गाला एस – 16 44900-112400 ऐवजी एस – 17   , 47600-151100 वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे .

त्याच धर्तीवर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 18 डिसेंबर 1995 नुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांमधील स्वीय सहाय्यक या संवर्गाला एस – 16 , 44900-142400 ऐवजी एस 17 , 47600-151100 अशी वेतनश्रेणी लागु करण्यात आली आहे .

सदर निर्णय हा वित्त विभागाच्या दिनांक 02 जुन 2025 मध्ये नमुद करण्यात आलेल्या तरतुदीच्या जशाच्या तसे तरतुदी लागु करण्यात आले आहे .

Leave a Comment