10 वर्षे रोजंदारी / तासिक तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा शासन सेवेत नियमित करणेबाबत GR निर्गमित दि.17.09.2025

Spread the love

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ GR issued regarding regularization of services of daily wage/hourly wage employees in government service for 10 years ] : 10 वर्षे रोजंदारी / तासिक तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा शासन सेवेत नियमित करणेबाबत , आदिवासी विकास विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा / वसतिगृह मध्ये रोजंदारी / तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा ही शासन सेवेत नियमित करणेबाबत उच्च न्यायालयांमध्ये विविध रिट याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या .

सदर याचिकावर उच्च न्यायालयांकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्णयाच्या अधिन राहुन 10 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

हे पण वाचा : शिपाई ( गट ड ) संवर्गातील पदासाठी पदभरती..

या अनुषंगाने विभागाकडे प्राप्त यादीमध्ये जे रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचारी निकष पुर्ण करीत नाहीत , अशा कर्मचाऱ्यांचे नावे सदर नियमित करण्याच्या यादीमधून वगळण्यात येत आहेत .

याबाबत शासन निर्णयांमध्ये विभाग निहाय कर्मचाऱ्यांची नावे देण्यात आलेली आहेत . या निर्णयामुळे ज्यांचे 10 वर्षे सेवा पुर्ण झालेले आहेत , अशा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे .

या बाबतचा सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment