अर्जित रजा रोखिकरण बाबत महत्वपुर्ण परिपत्रक ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding cashing of earned leave ] : अर्जित रजा रोखिकरण संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक विभाग सर्व यांच्याप्रति महत्वपुर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .

सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहे‍त कि , राज्यातील खाजगी शाळामधील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 नुसार केवळ माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक यांना पुर्ण वर्ष करीता 15 दिवस अर्जित रजा मिळते .

तर राज्यामधील खाजगी शाळा मधील प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकांना अर्जित रजा मिळत नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे , म्हणजे केवळ माध्यमिक शाळांमधीलच मुख्याध्यापकांना अर्जित रजेचा लाभ मिळतो .

तसेच प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांना दिनांक 01 जुलै 1995 नुसार अर्धवेतनी रजा ऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी 10 दिवस मान्य करण्यात आलेली आहे .तर अर्धवेतनी रजेच्या ऐवजी प्राप्त होणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखीकरण करता येणार नसल्याची बाब यांमध्ये नमुद करण्यात आली आहे .

हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 122 रिक्त जागेसाठी पदभरती 2025 ;

खाजगी शाळा कर्मचारी नियमावली 1981 मध्ये अर्जित रजा विषयक तरतुद नमुद नसल्याने खाजगी प्राथमिक शाळामधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नसणार असल्याची बाब यामध्ये नमुद करण्यात आलेली आहे .

Leave a Comment