Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Decision (GR) for State Employees ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्र.विभाग मार्फत दि.25.08.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) 1979 च्या नियम 6 अ नुसार किरकोळ शिक्षांचे अधिकार कोणास राहतील या बाबतची तरतुद करण्यात आलेली आहे , त्यानुसार किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी व कर्मचाऱ्यांचे गट खालील प्रमाणे पाहु शकता ..

काही वेळा कर्मचाऱ्याकडून केलेल्या अनियमितेचे स्वरुप हे फारसे गंभीर नसल्याचे निदर्शनास येते अशावेळी अशा कर्मचाऱ्यांस किरकोळ शिक्षा देय ठरते , तर अपचाऱ्यास वेळीच शिक्षा होवून कार्यालयांमध्ये शिस्त राहणे आवश्यक आहे .
अन्यथा विभागीय चौकशीच्या कार्यवाहीस विलंब झाल्यास , व त्या अनुषंगाने शिक्षेस विलंब झाल्यास , अन्य कर्मचाऱ्यांमध्ये चुकीचा समज पसरतो . यास्तव अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी बाबतची कार्यवाही सुरु करण्यास व चौकशीची प्रकरणे निकाली काढण्यासाकरीता होणारा विलंब टाळण्यासाठी…
शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यास शिक्षेस मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी घोषित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच प्राधिकाऱ्यास विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करता येणार आहे .तसेच सदर अधिकाऱ्याच्या लगतच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याकडे अपील बाबतचे अधिकार सोपविण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click here
राज्य कर्मचारी असाल तर 104 कर्मचारी विषयक शासन निर्णयाची पुस्तिका आपल्या संग्रही असणे , अत्यंत फायदेशीर .. PDF स्वरूपात व्हाट्सअप वर सेंड केली जाईल लगेच खरेदी(किंमत फक्त 100/- रुपये) करण्यासाठी Click Here
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025