Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Khullar Committee: Why did the committee reject revised pay scales for 338 cadres? ] : खुल्लर समितीने सातवा वेतन आयोगातील वेतनत्रुटींचा अभ्यास करुन केवळ 442 संवर्गांपैकी केवळ 104 संवर्गांनाच सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याची शिफारशी केली आहे .
338 संवर्गांना सुधारित वेतनश्रेणी नाकारण्यात आले , त्यापैकी एका संवर्गांचा प्रस्तावाच प्राप्त झाला नसल्याने , सदर संवर्गास यांमधुन वगळण्यात आले . तर उर्वरित 337 संवर्ग बाबत समितीने केलेली मागणी व सदर प्रशासकीय विभागाचे अभिप्राय व समितीची शिफारस अहवालांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे .
ज्या संवर्गाना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आलेली आहे , अशा 104 संवर्गांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यास मंजुरी दिलेली आहे , व त्याबाबत वित्त विभाग मार्फत शासन निर्णय ( GR ) देखिल निर्गमित करण्यात आलेला आहे .
आपल्या विभाग निहाय संवर्ग व अहवाल खाली नमुद पीडीए मध्ये पाहु शकता ..
